IRCTC ची नवीन सुविधा पहा कसा घ्यायचा लाभ...

tipsinmarathi

***जय महाराष्ट्र***




आज आपण भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी देणार आहोत. जर तुम्ही ऑनलाइन रेल्वे तिकीट काढून रेल्वे प्रवास करीत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि कामाची ठरणार आहे… मित्रांनो जर आपल्याला रेल्वेने कुठे लांबचा प्रवास करायचा असल्यास कन्फर्म तिकीत मिळवण्यासाठी काही महिन्या अगोदर रेल्वेचे तिकीट बुक करावे लागते. परंतु जेव्हा आपल्याला कन्फर्म तिकीत मिळत नाही तेव्हा आपल्याला तत्काळ कोट्या मध्ये तिकीट बुक करावे लागेत, किव्वा एजंटच्या माध्यमातून तिकीट बुक करावे लागते. परंतु आता हा त्रास आणी झंझट आता संपणार आहे, करण्की Indian Railway Catering and Tourism Corporation म्हणजेच IRCTC ने एक नवीन सुविधा सुरु केलेली आहे. IRCTC ने Push Up नावाची एक नवीन सुविधा सुरु केलेली आहे.

आता जर ट्रेनमध्ये म्हणजेच रेल्वे गाडीत कोणतीही बर्थ रिकामी असेल किंवा रिकामी होणार असेल, तर तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळणार आहे आणि मग तुम्ही लगेच त्या सिटसाठी तिकीट बुक करू शकता… IRCTC च्या या नवीन सुविधेअंतर्गत पुश नोटिफिकेशनची ( Push Notification ) प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटला भेट देऊन पुश नोटिफिकेशन ( IRCTC Push Notification ) साठी नोंदणी करावी लागेल. यानंतर, जेव्हाही गाडी मध्ये सीट रिकामी झाली, तेव्हा त्याची माहिती तुम्हाला एका नोटिफिकेशनद्वारे म्हणजेच एका SMS द्वारे मिळेल.



उधार्नास समजा तुम्हाला एखाद्या तारखेसाठी रेल्वे तिकीट बुक करायचे आहे, पण ट्रेनमध्ये कोणतेही सीट उपलब्ध नसेल, त्यामुळे तूम्ही तिकीट बुकिंग केली नाही तर. यानंतर, तुम्हाला जिथे प्रवास करायचा आहे त्या रूट दरम्यान जर एखाद्या प्रवाशाने त्याचे तिकीट रद्द केले, तर आपल्या मोबाइलवर एक एसएमएस ( SMS ) येईल, ज्यामध्ये त्या गाडी संबंधीत माहिती असेल. या मध्ये गाडीच्या क्रमांकाची माहितीही असेल, त्यानंतर जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे रेल्वे तिकीट त्वरित बुक करून प्रवास करू शकता.

* आता या Push-Up सुविधेचा लाभ कसा घ्यायचा?


जेव्हा तुम्ही IRCTC वेबसाईट उघडता तेव्हा तुम्हाला पुश नोटिफिकेशनचा पर्याय मिळतो. ग्राहकांना हि विशेष पुश नोटिफिकेशनची सुविधा पूर्णपणे मोफत मिळणार आहे. यासाठी IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी लागेल आणि या सेवेची सदस्यता घ्यावी लागेल…

या सह ग्राहकांना या सुविधा देखील मिळणार आहेत…

  • आईआरसीटीसी ( IRCTC ) ट्रेनची माहिती
  • नव्या ट्रेनसंबंधित माहिती,
  • रिक्त जागांविषयी माहिती
  • हवाई तिकिट बुकिंगशी संबंधित माहिती
  • हॉटेल आणि कॅब बुकिंग संबंधित माहिती
  • बस बुकिंग सेवा
  • कॅटरिंग सेवांसह टूर पॅकेजची माहिती



Tags
To Top