***जय महाराष्ट्र***
आज आपण केंद्र सरकार च्या एका अशा योजने बद्दल माहिती देणार आहोत ज्या मध्ये महिलांच्या बँक खात्यात DBT द्वारे केंद्र सरकार कडून 5 हजार पाठविण्यात येतात. तर चला पाहूया काय आहे ही योजना,आणि या योजने साठी अर्ज कसा करायचा.
केंद्र सरकार द्वारे चालविल्या जाणाऱ्या या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने अंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ गरोदर व स्तनदा माता यांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट DBT द्वारे म्हणजेच Direct Benefit Transfer द्वारे जमा करण्यात येतात. या योजनेअंतर्गत जानेवारी २०१७ ते आतापर्यंत ३७ हजार ८७४ गरोदर महिलांच्या खात्यात १५ कोटी ३० लाख ८९ हजार रुपये जमा झाले आहेत…

कोरोना महामारीने (Coronavirus) लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या काळात अनेकांना आर्थिक संकटांनाही तोंड द्यावे लागत आहे. अशात आता पहिल्यांदाच गर्भवती महिलांसाठी जानेवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली ( PMMVY ) योजना म्हणजेच पंतप्रधान मातृत्व योजना वरदान ठरत आहे….
केंद्र सरकार गर्भवती महिलांच्या खात्यामध्ये 5000 रुपये जमा करत आहे. या योजने अंतर्गत पहिल्या जिवंत बाळाच्या जन्मा नंतर या योजनेचा लाभ गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना होणार आहे…. या योजनेच्या लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवली जाईल.
हि 5000 हजाराची रक्कम ३ हफ्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल…
- पहिला हफ्ता:- रु.1000 नोंदणीच्या वेळी मिळेल...
- दुसरा हफ्ता:- रु.2000, रुपयांचा असेल जे कि सहा महिन्यानंतर मिळेल…
- तिसरा हफ्ता:-2000 रुपये, जेव्हा मुलाच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि बीसीजी ( BCG ), ओपीव्ही ( OPV ), डीपीटी ( DPT ) आणि हिपॅटायटीस-बी ( Hepatitis B ) हे सर्व लस घेतल्या नंतर मिळेल…
आता आपण पाहूया या योजनेचा लाभ कोणाला मिळले -
या योजनेचा लाभ सर्व सामान्य महिलांना, रोज मजुरी चे काम करणाऱ्यांना किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांना मिळेल…
या योजने मध्ये अर्ज करण्यासठी तुम्ही pmmvy-cas.nic.in वर जाऊ शकता किंवा या योजने बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही 011 23382393 या क्रमांक वर काल करून अधिकची माहिती घेऊ शकता…