फक्त 10 मिनिटांत घरबसल्या मोफत मोबाईल द्वारे करा पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक.

Tips In Marathi

***जय महाराष्ट्र***

भारतीय नागरीकांसाठी आधार कार्ड (Aadhar Card ) आणि पॅन कार्ड (PAN card) हे दोन कागदपत्रे खूप महत्वाचे आहेत. कोणत्याही खाजगी किंवा सरकारी कामात या दोन कागदपत्रांची आवश्यकता असते. तसेच, बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी, प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच (Income tax return) भरण्यापासून ते मोठ्या बँकिंग व्यवहारांसाठी म्हणजेच 50000 हजार रुपया वरील व्यवहारासाठी आणि सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासह अनेक सरकारी कामांमध्ये पॅन कार्डची गरज असतेच. त्याचबरोबर इतर अनेक आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड असणं बंधनकारक असतं. तर, आधार कार्डचा वापर ओळख दर्शविण्यासाठी केला जातो. प्रत्येक नागरिकाकडे ही दोन कागदपत्रे असणे आवश्यक आहे.



आता आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो, आणि 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास पॅन कार्ड 1 एप्रिल 2022 पासून निष्क्रिय होणार आहे. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर ते तत्काळ करून घ्या.

तर चला आता आपण Step-By-Step पाहूया तुम्ही घरबसल्या तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड कशा प्रकारे लिंक करू शकता.

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometax.gov.in वर जावे लागेल.


Step 1:- या वेबसाईट वर आल्या नंतर खाली या येथे लिंक आधार या बटन वर क्लिक करा.


Step 2:- एक नवीन पेज उघडेल येथे पहिल्या बॉक्स मध्ये तुमचे पॅन कार्ड क्रमांक टाका या दुसऱ्या बॉक्स मध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक भरा त्या खालील बॉक्स मध्ये तुमच्या आधार कार्ड वर जसे नाव आहे Same तसेच नाव या बॉक्स मध्ये भर, आणि या चौथ्या बॉक्स मध्ये तुमच्या आधार कार्डा सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर टाका.


Step 3:- आता खाली जर तुमच्या आधार कार्डा वर फक्त जन्माचे वर्ष लिहलेल असेल तर दिलेल्या पहिल्या Check Box वर क्लिक करा आणि जर पूर्ण जन्म तारीख लिहलेली असेल तर या Check Box वर क्लिक करू नका.
आता या दुसऱ्या Check Box वर क्लिक करा आणि खाली दिलेल्या Link Aadhaar या बटन वर क्लिक करा.


Step 4:- आता तुमच्या आधार कार्डा सोबत लिंक मोबाईल नंबर वर एक सहा अंकी OTP येईल ती OTP येथे भरा आणि Validate बटन वर क्लिक करा.


Step 5:- आता एक POP-UP येईल. बस झाले आता पडताळणी खाल्या नंतर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डा सोबत लिंक करण्यात येईल.

pan aadhaar link 6
Tags
To Top