मोबाईल मधून पीएम किसान योजना KYC अशी करा | PM Kisan Yojana KYC in Marathi.

Tips In Marathi

***जय महाराष्ट्र***


मित्रांनो आज आपण प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती देणार आहोत. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही हे काम लवकरात लवकर केले नाही तर तुम्हाला प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभ देखील मिळणार नाही.
केंद्र सरकार कडून प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जर तुम्ही ekyc लवकर केली नाही तर तुम्हाला मार्च २०२२ पासून प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच 2000 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. तर चला पाहूया तुम्ही प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेची ekyc कशा प्रकारे करू शकता. तुम्ही घर बसल्या online पद्धतीने प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत website https://www.pmkisan.gov.in/ वर जाऊन किव्वा तुमच्या जवळील सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित OTP ekyc पूर्ण करू शकता…
तर चला आता पाहूया घर बसल्या तुमच्या मोबाईल द्वारे ekyc कशा प्रकारे करू शकता….

1) Ekyc करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत website pmkisan.gov.in वर जावे लागेल.

2) या website वर आल्या नंतर खली या येथे फार्मर्स कॉर्नर ( Farmers Corner ) सेक्शन दिसेल तुम्हाला यामध्ये eKYC या पर्यायावर क्लिक करावे लागेल.


3) आता एक नवीन पेज उघडेल या पहिल्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर Search या बटन वर क्लिक करा.

4) एक नवीन पेज उघडेल . इथं तुमचा मोबाईल नंबर टाका. येथे एक महत्वाची म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर टाकल्या नंतर Get OTP या बटन वर क्लिक करा…

5) Get OTP बटन वर क्लिक केल्या नंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड येईल. ती OTP येथे भरा आणि Submit OTP या बटन वर क्लिक करा…

6) Submit OTP बटन वर क्लिक केल्यानंतर ... येथे तुम्हाला Get Aadhar OTP बटन वर क्लिक करावे लागेल. या बटन वर क्लिक केल्या नंतर आणखीन एक OTP येईल..

7) आलेली OTP या बॉक्स मध्ये भरा आणि Submit For Authentication या बटन वर क्लिक करा.

त्यानंतर EKYC is Successfully Submitted असा मेसेज लिहून येईल. याचा अर्थ तुमची EKYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

पण, इथं एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा सरकारनं नुकतीच सुरू केली असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला Record not found किंवा Invalid OTP यासारखे error म्हणजेच तांत्रिक समस्या येऊ शकतात . त्यामुळे तुम्ही काही दिवसांनंतर पुन्हा प्रयत्न करू शकता किंवा जवळील सीएससी सेंटरवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
Tags
To Top