रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि पांढरे | शिधापत्रिका विषयी A-Z माहिती.

Tips In Marathi
***जय महाराष्ट्र***

tricolor ration card

आज आपण रेशनकार्ड विषयी महत्वपूर्ण माहिती देणार आहोत. ही माहिती कार्ड धारकांसाठी भविष्या मध्ये कधी पण कामी येऊ शकते जसे की रेशनकार्डचे कोण कोणते प्रकार आहेत. त्यासाठी लागणारी पात्रता, तुम्ही नवीन रेशन कार्ड साठी कशा प्रकारे अर्ज करू शकता आणि त्याचे फायदे काय काय आहेत या बद्दल माहिती देणार आहोत… शिधापत्रिका विषयी A-Z माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा..

१) रेशन कार्ड चे कोण कोणते प्रकार आहेत?गरजू कुटुंबांना अधिक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने 1 मे 1999 रोजी तिरंगी शिधापत्रिका योजना सुरू केली होती . यात, खालील निकषांनुसार राज्यात ३ वेगवेगळ्या रंगांच्या शिधापत्रिका जारी करण्यात आल्या आहेत:

आपल्याकडे रेशन कार्ड तीन प्रकारचे आहेत, पिवळे रेशन कार्ड. केशरी आणि शुभ्र रेशन कार्ड… हे कार्ड कुटुंबाच्या उत्पादनाच्या पातळीवर दिली जातात…

तर चला एक एक करून या शिधापत्रिकांची पात्रता काय आहे ते जाणून घेऊया…


१) पिवळे रेशन कार्ड:-

yellow ration card

गरिबी रेषेखालील बीपीएल अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते यामध्ये कुटुंबाचे उत्पन्न शहरी भागासाठी रुपये 15000 व दुष्काळग्रस्त भागासाठी 11000 आणि उर्वरित ग्रामीण भागासाठी 15000 वार्षिक उत्पन्न असले पाहिजे…

सध्या या कार्ड मध्ये काही बदल करण्यात आले आहे आता रेशन कार्डधारकांना कुटुंबातील ज्येष्ठ महिला कुटुंबप्रमुख म्हणून समाविष्ट करावे लागेल…

कुटुंबातील कोणतीही सदस्य डॉक्टर वकील किंवा आर्किटेक्ट व चार्टर्ड अकाउंटंट असू नये…

कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन नसावे किंवा सर्व कुटुंबातील सदस्याकडे मिळून दोन हेक्टर जिरायत किंवा एक हेक्टर हंगामी बागायत किंवा अर्धा हेक्टर बारामाही बागायत जमीन नसावी

कुटुंबाकडे निवासी टेलिफोन नसावा.


२) केसरी रेशन कार्ड:-

orange ration card

ज्या कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त आणि एक लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना केसरी रंगाचे रेशन कार्ड दिले जाते.

दुसरे म्हणजे कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी नसावे. (टॅक्सी सोडून) म्हणजेच टॅक्सी चालक केशरी रेशन कार्ड साठी पात्र आहेत.. तसेच कौटुंबिक मालकीची एकूण जमीन चार हेक्टर पेक्षा जास्त नसावी…

३) पांढरे रेशन कार्ड:-

white ration card

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अथवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर किंवा 4 हेक्‍टरपेक्षा जास्त बागायती जमीन असणार्‍या कुटुंबाला पांढरी शिधापत्रिका दिली जाते.


रेशन कार्डचे फायदे आणि रेशन कार्ड का आवश्यक आहे…

नंबर 1:-
रेशन कार्ड आयडी प्रुफ म्हणजेच ओळखीचा पुरावा तसेच रहिवाशी पुरावा म्हणजेच ॲड्रेस प्रूफ म्हणून सादर करता येते

नंबर 2:-
सर्व सरकारी योजनेमध्ये आणि सरकारी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड वैद्य पुरावा म्हणून वापरला जातो

नंबर 3:-
आपल्याला एलपीजी नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी आणि गॅस सबसिडी मिळवण्यासाठी देखील रेशन कार्ड द्यावे लागते

नंबर 4:-
मोफत आणि कमी भावात रेशन मिळते तसेच सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना चा कालावधी वाढवून डिसेंबर पर्यंत केलेला आहे या योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू तांदूळ आणि एक किलो चणाडाळ फ्री मध्ये म्हणजेच मोफत ३१ डिसेंबर पर्यंत दिली जाणार आहे यासाठी पण रेशन कार्ड उपयोगी ठरणार आहे…


दरमहा किती धान्य मिळते ?शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना केंद्रस्थानी ठेवून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवण्याची योजना महाराष्ट्रात एक जून 1997 पासून सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत सुरुवातीला गरीब कुटुंबाला दरमहा दर महिन्याला दहा किलो अन्नधान्य प्रचलित दराच्या अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिलं जात होतं यात प्रामुख्याने गहू आणि तांदूळ दिले जात होते मात्र 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली त्यानुसार लाभार्थ्याचे अंत्योदय गट आणि प्राधान्य गट असे दोन गट तयार करण्यात आले अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांना 2002 च्या सुधारित नियमाप्रमाणे 35 किलो धान्य वाटप करण्यात येते तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य वाटप करण्यात येते शहरी भागात 59 हजार रुपये तर ग्रामीण भागात 44 हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना प्राधान्य गटातील या योजनेचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

तर चला आता तुम्ही रेशन कार्ड कशा प्रकारे बनवू शकता त्या बद्दल माहिती जाणून घेऊया..
या साठी तुम्हाला सर्वात प्रथम नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करण्याचा फॉर्म भरावा लागेल तुम्ही हा फॉर्म mahafood.gov.in किंवा तुम्ही तहसील कार्यालयातून हा फॉर्म घेऊ शकता या फॉर्मला काळजीपूर्वक चांगल्या प्रकारे भरा… आता या फॉर्म सोबत तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागेल तर चला कोण कोणती कागदपत्रे वैध आहेत ते पाहूया… ओळख आणि पत्त्याच्या प्रमाणीकरणासाठी तुम्ही यापैकी कोणतेही दस्तऐवज रेशन कार्ड अर्जासोबत जोडू शकता –

कुटुंब प्रमुखाचे तीन पासपोर्ट आकाराचे फोटो….
आधार कार्डची झेरॉक्स किंवा आधार कार्ड नोंदणी केली असेल तर त्याची पावतीची झेरॉक्स
पॅन कार्डची झेरॉक्स
अर्जदाराच्या नावावरील एलपीजी गॅस पासबुक
मनरेगा जॉब कार्डची झेरॉक्स
मतदार ओळखपत्र
बँक पासबुक

तुम्ही राहत असलेल्या जागेचा पुरावा म्हणून स्वतःचे घर असल्यास विज बिल किंवा चालू वर्षाची मिळकत कर पावती,तसेच घर भाड्याचे असल्यास घर मालकाचे संमतीपत्र व त्याच्या नावे विज बिल किंवा चालू वर्षाचे मिळकत कर पावती.

आता या पैकी एक ओळख पत्र आणि एक पत्त्याचा पुरावा फॉर्म सोबत जोडा आणि या फॉर्मला अर्ज सादर करताना रू.२ चा कोर्ट फी स्टॅम्प लावा…

अर्ज तयार केल्यानंतर, ग्रामपंचायत किंवा नगर पंचायत यांच्या मान्यतेचा शिक्का आणि स्वाक्षरी घ्या. आता या फॉर्म ला अन्न विभागाने नियुक्त केलेल्या कार्यालयात किंवा शिधापत्रिकेसाठी तुम्ही जेथून फॉर्म घेतला असेल त्या कार्यालयात जमा करा. अर्ज सादर केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. अर्ज योग्य आढळल्यास म्हणजेच वेरिफिकेशन मध्ये सर्व कागदपत्रे आणि माहिती बरोबर असल्यास, तुम्हाला पात्रतेनुसार रेशन कार्ड (शिधापत्रिका) दिले जाईल.


आता ही माहिती प्रत्येक रेशन कार्डधारकांना असणे आवश्यक आहे...
नंबर 1:-
देशभरात एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजना केंद्र सरकारने लागू केल्यामुळे कोणत्याही रेशनकार्डधारकांना देशातील कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही रेशन दुकानातून धान्य रेशन घेण्याचा अधिकार आहे त्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड मध्ये एड्रेस पत्ता वगैरे बदलण्याची अजिबात गरज नाही
नंबर २:-
तुमचे रेशन कार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा व ते रद्द करण्याचा अधिकार रेशन दुकानदाराला नाही व महत्त्वाचे म्हणजे E-POS मशीनवर अंगठा घेतल्यावर दिलेल्या पैशाची पावती रेशन दुकानदाराला शिधापत्रिका धारकास देणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला दुकानदार पावती देत नसेल तर त्याची तक्रार देखील तुम्ही करू शकता

नंबर 3:-
रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डधारकांना स्पष्टपणे वाचता येईल असे दुकानाची वेळ दुकानाचा क्रमांक त्याचा फोन नंबर रेशन वाटप कार्यालयाचा पत्ता यांची माहिती देणारा फलक लावणे आवश्यक आहे व त्याचबरोबर स्वस्त धान्य दुकान हे आठवडी सुट्टी वगळता सकाळी चार तास व सायंकाळी चार तास उघडे असायलाच पाहिजे…

जर का तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही येथे थेट तक्रार करू शकता तक्रार निवारण केंद्र सकाळी 10 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालू राहते... या नंबर वर तक्रार आपण करू शकता 1967 किंवा 1800 22 4950 या निशुल्क टोल फ्री नंबर वर तक्रार नोंदविता येते सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण केंद्र helpline(dot)mhpds(at)gov(dot)in सुविधा उपलब्ध आहे…
To Top