IPL चा इतिहास पहा! (मराठीत) | History of IPL (Indian Premier League) in Marathi.

Tips In Marathi
***जय महाराष्ट्र***

ipl cha itihas

IPL चा इतिहास (History of IPL in Marathi)

क्रिकेटची आवड प्रत्येक गल्लीत आणि परिसरात पाहायला मिळते. क्रिकेट भारतात सर्वात जास्त पसंत केले जाते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत महिलांनाही क्रिकेटचे वेड लागले आहे. भारतातच क्रिकेटचे करोडो चाहते आहेत आणि हा एक असा खेळ आहे जो केवळ पाहिला जात नाही तर एखाद्या सणासारखा साजरा केला जातो.

इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL BCCI (बी.सी.सी.आय) अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ द्वारे संचालित एक स्पर्धा आहे… हि स्पर्धा म्हणजेच IPL भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. IPL ची सुरवात 2008 मध्ये झाली होती. IPL ही एक T20 लीग आहे, जी भारतात दरवर्षी खेळली जाते. ज्यामध्ये भारताच्या खेळाडूंशिवाय इतर देशांचे खेळाडूही सहभागी होतात.

आयपीएल दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित केले जातो. 2022 ते 2027 पर्यंत IPL चे टायटल स्पॉन्सर भारतीय टाटा ग्रुप (TATA Group) आहे.

कोणतीही टीम या तीन पैकी कोणत्याही प्रकारे खेळाडू मिळवू शकते.

१) वार्षिक खेळाडूंचा लिलाव,

खेळाडू (Players) Auction साठी म्हणजेच लिलावासाठी साइन अप करतात आणि त्यांची मूळ किंमत देखील सेट करतात म्हणजेच कोणतीही फ्रँचायझी त्यांना कमीत कमी किती किंमतीत खरेदी करू शकते आणि त्या खेळाडू (Player) साठी सर्वाधिक (सर्वात जास्त) बोली लावणार्‍या फ्रँचायझीद्वारे त्यांना खरेदी केले जाते.

२)ट्रेडिंग विंडो दरम्यान इतर Teams सह खेळाडूंचा Trade करणे

साधारणपणे तीन ट्रेडिंग विंडो असतात या मध्ये दोन Auction पूर्वी म्हणजेच लिलावापूर्वी आणि एक Auction नंतर म्हणजेच लिलावानंतर पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी. मात्र महत्वाचे म्हणजे खेळाडूंना ट्रेडिंग विंडोच्या बाहेर किंवा स्पर्धेदरम्यान व्यापार करता येत नाही, तर बदली खेळाडूंना स्पर्धेपूर्वी किंवा दरम्यान साइन करता येते.

आणि ३)अनुपलब्ध खेळाडूंच्या ( Unavailable Players च्या ) बदलीसाठी कोणत्या दुसऱ्या खेळाडू ला साइन करणे.

ipl history


तर आता आपण पाहूया IPL मध्ये जिंकणाऱ्या टीमला किती Prize Money दिली जाते.

IPL (Indian Premier League) च्या 2019 Season मध्ये एकूण Prize Money ₹50 कोटी होती, यातून विजेत्या Team ला ₹20 कोटी ची एकूण बक्षीस रक्कम ऑफर केली होती. . प्रथम आणि द्वितीय उपविजेत्या Teams ला अनुक्रमे ₹12.5 कोटी आणि ₹8.75 कोटी मिळाले, चौथ्या स्थानावर असलेल्या Team ला ₹8.75 कोटी मिळाले होते. या जिंकलेल्या Prize Money मधून आयपीएल नियमानुसार अर्धी रक्कम खेळाडूंमध्ये वाटली जाणे आवश्यक आहे.

To Top