आता वाढत्या गॅस सिलेंडरच्या किंमती ची चिंता राहणार नाही. फक्त...

Tips In Marathi
***जय महाराष्ट्र***

आज आपण सर्व गॅस ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी देणार आहोत…

lpg gas new update

घरगुती LPG गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे लोकांचे बजेट बिघडत आहे. या सोबतच सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. मात्र एलपीजीच्या वाढत्या किमतीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी सरकारने एक नवीन उपाय आणला आहे… आता गॅसच्या वाढत्या किमती असो की वाढती महागाई आता स्वयंपाकाचे टेन्शन राहणार नाही… कारण सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने या वर तोडगा काढत सौरऊर्जेवर चालणाऱ्या एका अनोख्या स्टोव्हची निर्मिती केली आहे…

तर चला या स्टोव्ह बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया जसेकी या स्टोव्ह ची किंमत किती आहे… या स्टोव्ह मध्ये फीचर्स काय काय आहेत आणि तुम्ही या स्टोव्ह ला कुठून खरीदी करू शकता…

इंडियन ऑइल (IOCL) कंपनीने या सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेगडीचे नाव सूर्य नूतन असे ठेवले आहे… इंडियन ऑइलच्या संशोधन आणि विकास केंद्र (R&D Unit), फरीदाबाद युनिटने हि शेगडी डिझाइन आणि विकसित केली आहे.

देशाचे प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाने प्रेरित होऊन सूर्य नूतन विकसित करण्यात आल्याचे इंडियन ऑईल कंपनीने सांगितले आहे. श्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2017 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना संबोधित करताना, वापरण्यास सोपा आणि पारंपारिक चुलींची जागा घेऊ शकणार्‍या स्वयंपाकघरासाठी उपाय विकसित करण्याचं आवाहन केलं होतं…

मागेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या निवासस्थानी हि सूर्य नूतन शेगडी प्रदर्शित करण्यात आली होती. श्री.  गिरिराज सिंह (केंद्रीय मंत्री) आणि श्री. हरदीप सिंग पुरी (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री) यांनी इंडियन ऑइलच्या या सौरऊर्जेवर चालणाऱ्या स्टोव्हची पाहणी केली होती. .

तर चला या सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेगडीच्या फिचर्स बद्दल माहिती जाणून घेऊया…

surya nutan solar stove

सूर्या नूतन सोलर कुक टॉपमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा सौर स्टोव्ह (Solar Surya Nutan Stove) उन्हात ठेवण्याची गरज नाही. या शेगडीचा वापर तुम्ही किचन (Kitchen) मध्ये किंवा तुमच्या सोयीनुसार कुठेही करू शकता. ही एक रिचार्जेबल इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीम आहे. यावर तुम्ही चार जणांच्या कुटुंबासाठी पूर्ण जेवण म्हणजेच (नाश्ता + दुपारचे जेवण + रात्रीचे जेवण) बनवू शकता.

या सूर्य नूतन शेगडीचे एक युनिट सूर्यप्रकाशात असते म्हणजेच सोलर पॅनेल्स तुम्हाला सूर्य प्रकाशात ठेवावे लागतील आणि दुसूर भाग म्हणजे शेगडी तुम्ही स्वयंपाकघरात किंवा तुमच्या सोयीनुसार कुठेही ठेऊ शकता…

सूर्या नूतन स्टोव्ह मध्ये हायब्रिड मोड देखील आहे म्हणजेच सूर्य प्रकाश नसतांना किंवा खराब वातावरण असल्यास सौरऊर्जेशिवाय या स्टोव्ह ला तुम्ही विजेवर देखील चालवू शकता..

तर चला आता या स्टोव्ह ची किंमत किती असेल ते पाहूया कंपनीने या सूर्या नूतन शेगडीला तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध केले आहे.

surya nutan solar stove
L model
LD model आणि
LDB modelसूर्य नूतनच्या L मॉडेल चा वापर तुम्ही फक्त सूर्य प्रकाश असतंच करू शकता…

सूर्या नूतन LD मॉडेल वर तुम्ही दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण बनवू शकेल…

आणि सूर्या नूतन LDB मॉडेल वर नाश्ता, दुपारचे जेवण सोबतच रात्रीचे जेवण तयार करता येईल…

आणि या वर तुम्ही रात्रीच्या वेळी देखील स्वयंपाक करू शकता…

आता आपण या सूर्य नूतन शेगडीच्या किमती विषयी माहिती घेऊया…
IOC म्हणजेच Indian Oil Corporation Limited च्या वेबसाईट वर दिलेल्या माहिती नुसार, सूर्या नूतनची किंमत 18,000 ते २३,000 रुपयांच्या दरम्यान असेल. यावर सरकार कडून अनुदानदेखील दिला जाईल. सबसिडीनंतर यासूर्य नूतन शेगडीची किंमत १०,००० ते १२,००० रुपये असू शकते.

उधारणास जर का 6-8 एलपीजी सिलिंडरचे वार्षिक वापर असलेल्या घरात, हि सूर्य नूतन शेगडी पहिल्या 1-2 वर्षांतच खरेदीदाराला परतफेड करू शकते.

तर हि शेगडी तुम्ही कुठून खरीदी करू शकता… .

IOC (Indian Oil Corporation limited) ने नुकतेच सूर्या नूतन (Surya Nutan) चे प्रारंभिक मॉडेल सादर केले आहे. व्यावसायिक मॉडेल (Commercial Model) लाँच व्हायचे आहे. सध्या देशात ६० ठिकाणी या सूर्या नूतन शेगडीची चाचणी सुरु आहे.

लवकरच हि शेगडी खरीदी करण्यास उपलब्ध होणार आहे…
Tags
To Top