पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्याची प्रमुख वैशिष्ट्ये, फक्त 500 रुपये गुंतवा!

Tips In Marathi
***जय महाराष्ट्र***

मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिसच्या PPF योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया जसेकी या योजनेत कोण कोण लाभ घेऊ शकतील. अटी व शर्ती काय काय आहेत. या साठी कागदपत्र काय काय लागतील.

post office ppf account

PPF हे एक दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. तुम्ही PPF अकाउंट पोस्ट ऑफिस मध्ये किव्वा कोणत्याही बँकेत उघडू शकता. पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षाच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंड वर म्हणजेच (पी.पी.एफ) वर सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे.

तर चला पाहूया कोण कोण या योजने साठी पात्र आहेत. १८ वर्षावरील कोणत्याही भारतीय नागरिकाला ppf मध्ये आपले खाते उघडता येते… अल्पवयीन मुलाच्या वतीने पालक पोस्ट ऑफिसमध्ये अल्पवयीन PPF खाते उघडू शकतात. PPF खात्यावर RBI (Reserve Bank Of India) ने अनिवार्य केल्यानुसार 7.1% प्रतिवर्ष मिळेल आणि पोस्ट ऑफिस PPF खात्यावर 31 मार्च रोजी चक्रवाढ व्याज (Compound Interest) दरवर्षी दिले जाते. तुम्ही वर्षातील कोणत्याही वेळी पीपीएफ (PPF) खात्यात पैसे जमा करू शकता, हे PPF खाते सक्रिय ठेवण्यासाठी किमान वार्षिक गुंतवणूक 500 रुपये आहे. म्हणजेच खाते सुरु ठेवण्यासाठी वर्षात तुम्हाला कमीत कमी 500 रुपय भरावे लागतील, आणि एका आर्थिक वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये भरण्याची म्हणजेच जमा करण्याची परवानगी आहे. या सह PPF मध्ये गुंतवलेली मूळ रक्कम, मिळालेले व्याज (Interest)आणि मॅच्युरिटी रक्कम (Maturity Amount) या सर्व करमुक्त (Tax Free) आहेत. इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत ठेवी वजावटीसाठी म्हणजेच Deductions साठी पात्र ठरतात.

आता पोस्ट ऑफिस पीपीएफ खाते सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणती आहेत ते आता आपण पाहूया. 

ID Proof म्हणून - 
मतदार ओळखपत्र, 
पासपोर्ट, 
ड्रायव्हिंग लायसन्स, 
आधार कार्ड 
(या पैकी एक दस्तावेज)

पत्ता पुरावा- 
मतदार ओळखपत्र,
पासपोर्ट,
ड्रायव्हिंग लायसन्स,
आधार कार्ड,
पॅन कार्ड,
(या पैकी एक दस्तावेज)

आणि पासपोर्ट आकाराचे फोटो. 

आता हे खाते उघडण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या. या PPF खात्याची माँटुरिटी 15 वर्षाची असेल. जर का तुम्हाला PPF खात्यातून पैसे काढायचे असेल तर खाते उघडण्याचे वर्ष वगळून पाच वर्षांनी एका आर्थिक वर्षात खातेधारक एकदा पैसे काढू शकतात. उदाहरणार्थ (2020-21) मध्ये खाते उघडल्यास 2026-27 दरम्यान किंवा नंतर पैसे काढले जाऊ शकतात.

मुदतपूर्तीवर ठेवीदाराकडे खालील पर्याय आहेत:-

(a) संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करून मॅच्युरिटी पेमेंट घेऊ शकता किव्वा,
 
(b) PPF खात्यात पैशे डिपोजीट न करता मॅच्युरिटी रक्कम खात्यात ठेवू शकता. या रकमेवर तुंहाला व्याज देखील मिळेल आणि कधीही पैशे घेतले जाऊ शकते किंवा खाते धारक प्रत्येक आर्थिक वर्षात एकदा पैसे काढू शकतात. आणि जर का तुम्हाला 15 वर्षाहून अधिक काळासाठी PPF अकाउंट चालू ठेवायचे असेल तर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये एक्स्टेंशन फॉर्म सबमिट करून खाते पुढील 5 वर्षांच्या ब्लॉकसाठी वाढवू शकते.(मात्र या साठी मॅच्युरिटीच्या एका वर्षाच्या आत अर्ज करावे लागेल) आता एक महत्वाचे प्रश्न म्हणजे तुम्ही या खात्याला लवकर बंद करू शकता का ? खाते उघडल्यानंतर केवळ 5 आर्थिक वर्षांनी पीपीएफ खाते वेळेपूर्वी बंद करण्याची परवानगी आहे.

मात्र याला फक्त तीन कारणांसाठी परवानगी आहे: खातेदार/पती/पत्नी/मुलांना होणारे जीवघेणे आजार किंवा गंभीर आजार मुलांचे किंवा खातेदाराचे. 
उच्च शिक्षण: उच्च शिक्षण किव्वा खातेदाराच्या निवासी स्थितीत बदल ( म्हणजेच NRI ) जर PPF खातेदाराचे मृत्यू झाल्यास, खाते बंद केले जाईल आणि Nominee ला खात्यात Deposits करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
To Top