आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी. UIDAI ने सर्व नागरिकांसाठी आधार...

Tips In Marathi
***जय महाराष्ट्र***
आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी. आजच्या काळात सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. आधार कार्डाशीवाय तुम्ही कोणतेच काम करू शकत नाही, कारण बँकेत खाते उघडण्या पासून ते सिम कार्ड खरेदी करण्या पर्यंत सर्व कामांसाठी आधार कार्ड विचारले जाते. आज काल आधार कार्डा शिवाय तुम्ही कोणतेच काम करू शकत नाही. अशातच Unique Identification Authority of India अर्थात UIDAI ने मोठा निर्णय घेतला आहे. UIDAI (Unique Identification Authority of India ), ने आधारची व्याप्ती वाढवण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे. यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI राज्यांना सरकारी कामात आधारची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे. 

 या योजनेनुसार, राज्यांमधील सरकारी योजनांमध्ये आधार ऑथेंटिकेशनचा (Aadhaar Authentication) वापर वाढवण्यात येणार आहे. बनावट लाभार्थ्यांना योजनेच्या कक्षेतून वगळणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे, म्हणजेच जे लोग पात्र नसतांनाही शासकीय योजनांचा लाभ घेत आहे त्यांना योजनांच्या कक्षेतून वगळणे हे याचा मुख्य उद्देश आहे.  या करीता युआयडीएआय सरकारी कर्मचाऱ्यांना आधारशी निगडीत प्रशिक्षण देत आहे. या योजनेनुसार UIDAI लोकांना १० वर्षांमध्ये एकदा आपले बायोमॅट्रिक ( Biometrics Update ) आणि, डेमोग्राफिक डेटा अपडेट  ( Demographic Data Update ) करण्याची मुभा देणार आहे. सध्या हा नियम लागू करण्यात आलेला नाही. सध्याच्या लागू नियमानुसार पाच ( ५ ) ते पंधरा ( १५ ) वर्षांच्या मुलांनाच बायोमॅट्रिक अपडेट ( Biometrics Update ) करण्याची परवानगी आहे. तसेच वयाच्या ७० नंतर बायोमॅट्रिक डेटा अपडेट करण्याची गरज भासणार नाही. 

UIDAI ने सांगितले आहे की असे केल्याने बनावट व फेक आधार कार्डांवर आळा बसेल…  तसेच आधार डेटा देखील पूर्णपणे सुरक्षित राहील. UIDAI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कोणतीही व्यक्ती त्याच्या आधार कार्ड मध्ये दर दहा वर्षांनी बायोमेट्रिक्स आणि डेमोग्राफिक तपशील अपडेट करू शकते. 

आजच्या काळात आधार कार्ड महत्वाचे असल्याने तुमचे आधार कार्ड Update ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या जवळील आधार केंद्रावर जाऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. यासोबतच तुम्ही घर बसल्या डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करू शकता… घरबसल्या तुम्ही नाव, जन्म तारीख, आणि GENDER बदल करू शकता… मात्र  बायोमेट्रिक्स तपशील अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल…
Tags
To Top